सूचना

शेतकरी बंधू भगिनींसाठी महत्वाची सुचना:

प्रिय शेतकरी बंधू/ भगिनी,
महा-डीबीटी शेतकरी पोर्टल लवकरच पुन्हा उघडण्यात येईल आणि शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजनांतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करू शकतील. सन २०२५-२६ पासून अर्ज मंजुरीसाठी "प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य" हि कार्यपद्धती अवलंबवण्यात येत आहे. आपण यापूर्वी केलेले अर्ज या साठी ग्राह्य धरण्यात येतील. आपल्या अर्जाचा यादीतील अनुक्रमांक खाली दिलेल्या "शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी" या लिंक वर क्लिक करून आपण बघू शकता. तसेच सदर यादी बद्दल आपल्याला काही शंका/अडचण असल्यास 022-61316429 या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ वा. (सोमवार ते शुक्रवार) दरम्यान संपर्क करू शकता.

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

योजनेबद्दल


विभागाचे नाव

कृषी विभाग


सारांश

    राज्यात शेती व्यवसाय करतांना होणारे अपघात रस्ता/रेल्वे अपघात, पाण्यात बूडून मृत्यू, जंतूनाशके हाताळतांना अथवा अन्य कारणामुळे विषबाधा, विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरुन पडून झालेला अपघात, सर्पदंश व विंचुदंश, बाळंतपणातील मृत्यू नक्षलाईटकडून झालेल्या हत्या, जनावरांच्या खाल्ल्यामुळे / चावण्यामुळे जखमी/ मृत्यू, दंगल, इत्यादी अपघातामुळे मृत्यू अथवा अपंगत्व आल्यास सदर योजनेतून अपघातग्रस्त शेतकरी / शेतक-याच्या वारसदारास गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेतून लाभ दिला जातो.

अनुदान

    अपघाताची बाब नुकसान भरपाई (रु.लाख)
    अपघाती मृत्यू रुपये 2,00,000/-
    अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी होणे रुपये 2,00,000/-
    अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी होणे रुपये 2,00,000/-
    अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव निकामी होणे रुपये 1,00,000/-

पात्रता

    कृषि गणनेनूसार निर्धारीत केलेल्या सर्व वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेले शेतक-यांच्या कुटुंबातील कोणताही 1 सदस्य (आई-वडील, शेतक-याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती ) असे 10 ते 75 वयोगटातील एकूण 2 जणांचा समावेश असेल.

    वारसदार : -1) अपघातग्रस्ताची पत्नी / अपघातग्रस्त स्त्रीचा पती 2) अपघातग्रस्ताची अविवाहित मुलगी 3) अपघातग्रस्ताची आई 4) अपघातग्रस्ताचा मुलगा 5) अपघातग्रस्ताचे वडील 6) अपघातग्रस्ताची सून 7) अन्य कायदेशीर वारसदार.

आवश्यक कागदपत्रे

  • 7/12 उतारा
  • मृत्यूचा दाखला
  • शेतकऱ्यांचे वारस म्हणून गावकामगार तलाठ्याकडील गांव नमुना नं. 6- क नुसार मंजूर झालेली वारसाची नोंद
  • शेतक-याच्या वयाच्या पडताळणी करीता शाळा सोडल्याचा दाखला / आधारकार्ड / निवडणूक ओळखपत्र. ज्या कागदपत्रा आधारे ओळख/वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्रे
  • प्रथम माहिती अहवाल / स्थळ पंचनामा / पोलीस पाटील माहिती अहवाल

Related Documents