सूचना

शेतकरी बंधू भगिनींसाठी महत्वाची सुचना:

प्रिय शेतकरी बंधू/ भगिनी,
महा-डीबीटी शेतकरी पोर्टल लवकरच पुन्हा उघडण्यात येईल आणि शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजनांतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करू शकतील. सन २०२५-२६ पासून अर्ज मंजुरीसाठी "प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य" हि कार्यपद्धती अवलंबवण्यात येत आहे. आपण यापूर्वी केलेले अर्ज या साठी ग्राह्य धरण्यात येतील. आपल्या अर्जाचा यादीतील अनुक्रमांक खाली दिलेल्या "शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी" या लिंक वर क्लिक करून आपण बघू शकता. तसेच सदर यादी बद्दल आपल्याला काही शंका/अडचण असल्यास 022-61316429 या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ वा. (सोमवार ते शुक्रवार) दरम्यान संपर्क करू शकता.

प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD)योजना

योजनेबद्दल


विभागाचे नाव

कृषी विभाग


सारांश

    कार्यक्षेत्र:राज्यातील सर्व ३४ जिल्हे.

    प्रकल्प निवड:

    1. योजनेत समूह आधारीत प्रकल्प (Area/Cluster based approach) धोरण स्वीकारलेले आहे.
    2. सन २०२५-२६ करीता प्रत्येक उपविभागातून दोन प्रकल्पांची निवड करण्यात यावी.
    3. किमान २० हेक्टरचा एक प्रकल्प (समूह) याप्रमाणे प्रकल्प आराखडे तयार करावयाचे आहे.
    4. योजनेंतर्गत प्रकल्पांची (Cluster) निवड करताना खालील गावांना प्राधान्य देण्यात यावे : -
    • पावसावर आधारित ६०% पेक्षा जास्त क्षेत्र असलेल्या तालुक्यामधील गावे.
    • नैसर्गिक शेती समूह विकसित झालेली गावे.
    • WDC (Watershed Development Component) प्रकल्पांतर्गत गेल्या २० वर्षांत घेतलेले पाणलोट क्षेत्र.
    • NRLM (national Rural Livelihood Mission) चे महत्वाचे क्षेत्र असलेल्या तालुक्यातील गावे.
    • NITI आयोगाने निवडलेले महत्त्वाकांक्षी तालुक्यातील गावे.
    • NFSM कडधान्य/तेलबिया / पौष्टीक तृणधान्ये पिके योजनेंतर्गत समाविष्ट गावे.
    • धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत वनपट्टेधारक क्षेत्र असलेली गावे.
    • गावांची निवड करतांना शक्यतो जिल्हयातील अनुसुचित जाती व अनुसुचित जमाती बहुल गावे.

अनुदान

    लाभार्थी अनुदान :

    1. १) कोरडवाहू क्षेत्र विकास (RAD) योजनेंतर्गत समाविष्ट बाबीसाठी प्रति शेतकरी कुटुंबाला कमाल रक्कम रु. ३०,०००/-च्या मर्यादेत अनुदान देय आहे. याव्यतिरिक्त अधिकचा लाभ अभिसरणाच्या माध्यमातून देण्यात यावा.
    2. २)क्षमता बांधणी व मनुष्यबळ विकास महाराष्ट्र ग्रामिण जिवानोन्नती अभियान (SRLM), स्वयंसहायता गट (SHG), NF मधील उत्कृष्ट शेतकरी यांचे समुदाय संसाधन व्यक्ती (CRPs) मार्फत देखरेख आणि क्षमता बांधणी रु. 10,000/- प्रति प्रकल्प.
    3. अनुदानाकरिता लाभार्थी शेतकऱ्याचे जमीन धारणा/ शेतीचे क्षेत्र (Farm size) यांचे बंधन नसून अनुदानाची रक्कम सर्व शेतकऱ्यांसाठी त्याच्या जमिन धारणा विचारात न घेता एकसमान असेल.

पात्रता

    • केंद्र शासनाने विहित केलेल्या प्रवर्गनिहाय मंजूर अनुदानाच्या व लोकसंख्येच्या प्रमाणात लाभार्थी निवडले जातील, याची दक्षता घ्यावी. तसेच महिला व दिव्यांग शेतक-यांना प्राधान्य द्यावे. अनुसुचित जाती/जमाती मधील लाभधारकांनी जातीचा वैध दाखला स्वयंसाक्षांकीत करून अर्जासोबत जोडावा.
    • लाभार्थ्याचे बँक खाते हे आधारशी जोडलेले असणे आवश्यक आहे.
    • ) लाभार्थी हा सध्याच्या प्रचलित पीक पध्दतीमध्ये बदल करुन एकात्मिक शेती पध्दतीतील बाबी राबविण्यास इच्छुक असणे आवश्यक आहे.
    • धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत वनपट्टेधारक क्षेत्र असलेल्या गावांतील लाभार्थी.
    • Agristack मधील फार्मर आयडी असणे बंधनकारक राहील.

आवश्यक कागदपत्रे

    समाविष्ट घटक :

    सदर योजनेंतर्गत

    अ) एकात्मिक शेती पद्धती : (शेतीपिके / झाडे / पशुधन) यापैकी किमान दोन बाबी राबविणे अनिवार्य आहे. तसेच

    ब) शेती पुरक उपक्रम:

    • मूरघास युनिट
    • मत्स्योत्पादन युनिट
    • मधमाशीपालन
    • गांडूळखत युनिट / सेंद्रिय निविष्ठा उत्पादने, हिरवळीचे खत निर्मिती यापैकी किमान दोन बाबी राबविणे अनिवार्य आहे

Related Documents