सूचना

शेतकरी बंधू भगिनींसाठी महत्वाची सुचना:

प्रिय शेतकरी बंधू/ भगिनी,
महा-डीबीटी शेतकरी पोर्टल लवकरच पुन्हा उघडण्यात येईल आणि शेतकरी नवीन नोंदणी तसेच कृषी विभागाच्या योजनांतर्गत विविध घटकांसाठी अर्ज करू शकतील. सन २०२५-२६ पासून अर्ज मंजुरीसाठी "प्रथम अर्ज करणा-यास प्रथम प्राधान्य" हि कार्यपद्धती अवलंबवण्यात येत आहे. आपण यापूर्वी केलेले अर्ज या साठी ग्राह्य धरण्यात येतील. आपल्या अर्जाचा यादीतील अनुक्रमांक खाली दिलेल्या "शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जांची तारीख व वेळेनुसार क्रमवार यादी" या लिंक वर क्लिक करून आपण बघू शकता. तसेच सदर यादी बद्दल आपल्याला काही शंका/अडचण असल्यास 022-61316429 या हेल्पलाईन क्रमांकावर सकाळी ९ ते सायंकाळी ७ वा. (सोमवार ते शुक्रवार) दरम्यान संपर्क करू शकता.

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना (आदिवासी उप योजना / आदिवासी उप योजना बाह्य)

योजनेबद्दल


विभागाचे नाव

कृषी विभाग


सारांश

    अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच बदललेल्या परिस्थितीत शेतकऱ्यांची आवश्यकता विचारात घेऊन बिरसा मुंडा कृषि क्रांती योजना (क्षेत्रांतर्गत व क्षेत्राबाहेरील) ही सुधारित योजना सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत राबविण्यात येत आहे.

अनुदान

    सन २०२६-२७ करीता घटकनिहाय अनुदानाची उच्चतम मर्यादा खालीलप्रमाणे राहील:

    1. नवीन सिंचन विहीर: रु. ४,००,०००/-
    2. जुनी विहीर दुरुस्ती: रु. १,००,०००/-
    3. शेततळ्यांचे प्लॅस्टीक अस्तरीकरण: राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या मापदंडानुसार (रु. ९५/- प्रति चौ.मी.) प्रत्यक्ष खर्चाच्या ९०% किंवा रु. २,००,०००/- (यापैकी जे कमी असेल ते).
    4. इनवेल बोअरींग: रु. ४०,०००/-
    5. वीज जोडणी आकार: रु. २०,०००/- किंवा प्रत्यक्ष भरलेला आकार (यापैकी जे कमी असेल ते).
    6. पंप संच (डिझेल/विद्युत - १० HP पर्यंत): प्रचलित आर्थिक मापदंडाच्या / प्रत्यक्ष खर्चाच्या ९०% किंवा रु. ४०,०००/- (यापैकी जे कमी असेल ते).
    7. सोलार पंप (वीज जोडणी व पंप संच ऐवजी): ९०% किंवा रु. ५०,०००/- (यापैकी जे कमी असेल ते).
    8. एचडीपीई/पीव्हीसी पाईप: प्रचलित आर्थिक मापदंडानुसार १००% किंवा रु. ५०,०००/- (यापैकी जे कमी असेल ते).
    9. सुक्ष्म सिंचन संच (ठिबक/तुषार सिंचन पूरक अनुदान): 'प्रति थेंब अधिक पीक' + 'मुख्यमंत्री शाश्वत सिंचन' + बिरसा मुंडा योजनेतून १०% ते १५% पूरक (TopUp) अनुदान (एकूण ९०% अनुदान मर्यादेत; ठिबकसाठी कमाल रु. ९७,०००/- व तुषारसाठी कमाल रु. ४७,०००/-).
    10. यंत्रसामुग्री (बैलचलित/ट्रॅक्टरचलित अवजारे): रु. ५०,०००/- (१००% अनुदान / पूरक अनुदान).
    11. परसबाग: रु. ५,०००/-
    12. विंधन विहीर (वनक्षेत्रातील व वनक्षेत्रालगतच्या शेतकऱ्यांसाठी): रु. ५०,०००/- किंवा प्रत्यक्ष खर्च (सोलार पंपसह एकूण रु. १,००,०००/-).

पात्रता

  • लाभार्थी अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गातील शेतकरी असणे बंधनकारक आहे.
  • सक्षम प्राधिकरणाने दिलेले वैध जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • Farmer ID (शेतकऱ्याच्या नावे जमीन धारणेचा ७/१२ व ८-अ उतारा असणे आवश्यक (नगर पंचायत/नगरपालिका/महानगरपालिका क्षेत्राबाहेरील).

आवश्यक कागदपत्रे


    नवीन विहीर याबाबीकरीता:
    1. Farmer ID (7/12 व 8-अ चा उतारा)
    2. जातीचा वैध दाखला
    3. अपंग असल्यास प्रमाणपत्र
    4. संमतीपत्र / हमीपत्र

    जुनी विहीर दुरुस्ती/ इनवेल बोअरिंग याबाबीकरीता:
    1. Farmer ID (7/12 व 8-अ चा उतारा)
    2. जातीचा वैध दाखला
    3. अपंग असल्यास प्रमाणपत्र
    4. संमतीपत्र / हमीपत्र

    शेततळ्यास अस्तरीकरण / वीज जोडणी आकार / सूक्ष्म सिंचनसंच याबाबीकरीता:
    1. Farmer ID (7/12 व 8-अ चा उतारा)
    2. जातीचा वैध दाखला
    3. अपंग असल्यास प्रमाणपत्र
    4. संमतीपत्र / हमीपत्र
    5. महावितरण कोटेशन/टेस्ट रिपोर्ट

Related Documents