Notice

शेतकरी बंधू भगिनींसाठी महत्वाची सुचना:

महा डीबीटी पोर्टल - नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प [२.०] बाबत महत्वाच्या सूचना

१. अर्ज स्थलांतरण: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प [२.०] अंतर्गत समाविष्ट गावे, मंजूर घटक आणि ज्या अर्जदारांचे क्षेत्र ५ हेक्टरपेक्षा कमी आहे, अशा सर्व अर्जदारांचे अर्ज (ज्यांना पूर्व संमती मिळालेली नाही आणि प्रतीक्षा यादीतील अर्ज) महा डीबीटी पोर्टलवरून नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प [२.०] च्या नवीन पोर्टलवर स्थलांतरित करण्यात आलेले आहेत.

२. स्थलांतरित अर्जदारांसाठी सूचना: ज्या अर्जदारांचे अर्ज स्थलांतरित झाले आहेत, त्यांनी पुढील सर्व प्रक्रिया नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प [२.०] च्या नवीन पोर्टलवर करावी.
पोर्टल लिंक: https://dbt-ndksp.mahapocra.gov.in

३. पूर्वसंमती मिळालेल्या अर्जदारांसाठी सूचना: ज्या अर्जदारांना महा-डीबीटी पोर्टलवर पूर्वीच पूर्वसंमती (Pre-Sanction) मिळालेली आहे, त्यांनी त्यांची पुढील नियमित प्रक्रिया महा-डीबीटी पोर्टलवरच पूर्ण करावी.

४. नवीन अर्जदारांसाठी सूचना: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प [२.०] अंतर्गत समाविष्ट गावे, मंजूर घटक आणि ज्या अर्जदारांचे क्षेत्र ५ हेक्टरपेक्षा कमी आहे, अशा सर्व अर्जदारांनी नवीन अर्ज करण्यासाठी खालील पोर्टल लिंक वापरावी:
पोर्टल लिंक: https://dbt-ndksp.mahapocra.gov.in

Login

Applicant Login Here